मैं

मैं
मैं

Friday, August 6, 2010

माझे विश्वविद्यालय .

"ज्ञान शांति मैत्री "

ज्ञान शांति आणि मैत्री हे शब्द किती आपसुक वाटतात ।

प्रत्येकाच्या भविष्यासाठी 'ते' मनी भरून दाटतात।

या शब्दांना कशाची सीमा आहे ।

याचा अर्थ काढण्यात जीवन जात आहे।

या 'तीन ' शब्दांनी मला खुप ग्रासले आहे।

याचा विचार करण्याने जीवन त्रासलेआहे।

का म्हणून ? ह्या शब्दांच्या मी कोडयात पडलो ।

या प्रश्नाचा विचार करून मी कसा घडलो।

जेंव्हा मी या शब्दांना गंभीरतेने घेतो ।

तेंव्हा मी का म्हणून ? स्वत:ला विसरून जातो ।

या शब्दांचा खेल निराला कधी मला समजेल ।

आणि केंव्हा जीवनात मला यांचा अर्थ समजेल ।

निलेश बापूसाहेब झाल्टे
एम। ए । जनसंचार
०९८२२७२१२९२

Tuesday, August 3, 2010

माझ्या प्रिय मित्रांना

चला 'जिदगी वसूल' करायला..!



खूप बोलावंसं वाटतं..?
प्रचंड गप्पा मारायच्या असतात..?
- पण कुणी बोलायलाच नसतं..?
वेळच नसतो कुणाकडे..?
ज्याला त्याला 'कामाचंच' तेवढं बोलायचंय,
कामापुरतं..?
मनसोक्त, मनमोकळ्या
गप्पा मारायला जागाच नाही..?
- डोण्ट वरी..!!
आपण मारू वाट्टेल तेवढ्या गप्पा..
जगातल्या कुठल्याही विषयावर.. बिंधास्त..!!
पण त्यासाठी भेटायला तर हवं..?
- पण कुठे..?

**

म्हणायला खूप मित्रमैत्तिणी आहेत...
- पण मनातलं बोलावं असं कुणी नाही..?
आपल्या आत खोल खोल चाललेली वादळं पेलतील असे दोस्तच नाहीत..?
कट्ट्यावरचं एकटेपण खायला उठतं म्हणता..?
सगळ्यांमध्ये असूनही
डोळ्यात पाणी येतं म्हणता..?
असं का होतं आपलं..?
का होतं माहीत नाही; पण होतं हे खरं..?
पण असं एकटं एकटं कशाला कुढायचं..?
एकट्यानं कशाला रडायचं..?
आता आपण फक्त हसू,
मनातलं सारं बोलू
आणि जगाच्या डोळ्याला डोळा भिडवू..!
- पण हे जमेल कसं..?
डोण्ट वरी..!!
जमवू आपण,
आपल्या दोस्तांनाच नव्यानं भेटू आपण..!
- पण कुठे..?

**

बोअर झालं आता ऑर्कुट नि फेसबूक..!
ज्यांचे कधी चेहेरेही पाहिले नाहीत..
त्यांच्याशी किती वेळ बोलायचं..?
त्यांनी घातलेल्या नव्या शर्टाचं
आणि नव्या हेअरस्टाईलचं कौतुक
किती दिवस 'ऑनलाइन' करायचं..?
आणि किती दिवस पाठवायचं
खोट्टे खोट्टे स्माईली..?
आता आपण खरे खरे भेटू..
फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवायची गरजच नाही..!
डायरेक्ट फ्रेण्डशिपच करू..
इतके मित्रमैत्तिणी जोडू की
दे धम्माल..!
इतके धमाके करू की,
आपल्यासारखे आपणच..!
पण या धमक्यांसाठी
धमक आणि जिगर तर पाहिजे ना..?
डोण्ट वरी...
आपण भेटलो की
आपोआप सारं दणक्यात होईल,
मात्र त्यासाठी भेटायला तर हवं..?
भेटूच..
- पण कुठे..?

**

कोण म्हणतं,
जगात काही बदलत नाही..?
कोण म्हणतं,
काहीच केल्यानं काहीच वेगळं घडत नाही..?
कोण म्हणतं,
कुछ नहीं बदलनेवाला..?
आपण बदलवू..!
तुम्हाला वाटतं ना,
बोडक्या टेकाडावर जाऊन लावावी झाडं,
रुजवाव्यात बिया..
गाडी चालवताना
मोबाईलवर बोलणाऱ्यांची घ्यावी जरा शिकवणी,
रस्त्यात थुंकणाऱ्यांना द्यावं थोडं 'ग्यान..'?
काहीतरी असं करावं
ज्यानं आपण सोशली अॅक्टिव्ह राहू,
देश आणि समाज नंतर
आधी आपल्या कॉलेजात
आपल्या शहरात बदलाची
सच्ची सुरुवात करू..!
पण हे सारं
एकट्यादुकट्याचं काम नाही
असं लोक म्हणतात ना..?
मग आपण कुठे एकटे आहोत..?
'आपण'
सगळे एकत्र येऊ आणि एकदिलानं कामाला लागू..!
मात्र त्यासाठी एकत्र यायला हवं..!
-पण कुठे..?

**

कॉलेजातले तेच ते
रुटीन लेक्चर्स बोअर झालेत..?
त्याच त्या जुन्या नोट्स
घोकणं नकोसं झालंय..?
फिर ये टाईम है कुछ खास सिखने का..!
पुस्तकी ज्ञानाबरोबरच थेट अनुभव घेण्याचा..!
कष्टानं आयुष्य घडवणाऱ्या
आणि मनासारखं जगण्यासाठी
किम्मत मोजून
नवं जग घडवणाऱ्या
काही खास लोकांना भेटण्याचा..!
आपण ऐकू ते काय म्हणतात,
त्यांच्याशी बोलू,
प्रश्न विचारू..
वादही घालू..
आणि समजून घेऊ जगण्याची एक नवी रीत..
हे सारं करताना
आपण नव्या पुस्तकांविषयी बोलू,
नव्या सिनेमाविषयी चर्चा करू..
सिनेमे पाहू..
कडकडून वाद घालू
आणि मुख्य म्हणजे
आपल्या मतापेक्षा वेगळी मतं समजून घेऊ,
त्यांचाही आदर करायला शिकू..
जरा वाढवू सहनशक्ती..!
जमेल हे सारं..!
डोण्ट वरी..
आपण ठरवलंय ना तर नक्की जमेल..
त्यासाठीच तर भेटायचंय..!
- पण कुठे..?

**

कॉलेज का किग कौन...?
- मै हूँ ना..!!
- असं उत्तरही द्यावं लागू नये
इतका कॉलेजात चालला पाहिजे
आपला पत्ता असं वाटतं तुम्हाला..?
काय म्हणता, कॉलेजात वट आहे तुमची..?
कॉलेजातली फंक्शन्स-फेस्टिव्हल्स
सारं सारं तुम्ही अॅरेन्ज करता..?
(आणि पाडताही..!)
मग तर आपल्याला भेटायलाच हवं..?
तातडीनं..!
आपण असं काही तरी अॅरेन्ज करू की
आपली रग तर जिरेलच;
पण ज्यांच्यासाठी हा सारा प्रपंच करायचा
ते जाम खूश होतील आपल्यावर..!
आहे तयारी
सारी जबाबदारी घेऊन रात्रंदिवस राबायची..?
आमची तर आहे..?
आणि तुम्ही.. आहात तयार..?
मग भेटा, आम्हाला तातडीने..!
- पण कुठे?

**

तर भेटू आपण..!
आणि आपण म्हणजे कोण..?
आपण..!!
आम्ही आणि तुम्ही..
आम्ही?
तुमचीच फेवरिट 'ऑक्सिजन टीम'
आणि तुम्ही..?
म्हणजे आपण सारे !
एरव्ही आम्ही ज्या गप्पा
फक्त टीममध्ये मारतो
आणि आपण जे फक्त अंकातून भेटतो..
ते आता थेट भेटू..
एरव्ही तुम्ही आम्हाला
पत्रांतून भेटता आणि
आम्ही तुम्हाला अंकातून..
पण आता आपण खरंच भेटू..
तुमच्या शहरात..
तुमच्या गावात..
थेट आणि प्रत्यक्ष..
कशी वाटते आयडिया..?
आपल्या सगळ्यांसाठी
येत्या फ्रेण्डशिप डेनिमित्त
हे खास गिफ्ट..
आपण आता थेट भेटू..
लवकरच..
- पण कुठे?



लोकमत च्या सौजन्न्याने .....