मैं

मैं
मैं

Wednesday, September 5, 2012

ब्लॉग माझा..............


नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे चौथं वर्ष. पहिली ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सचे आता मेळावे होतायत, फेसबुकवर ग्रुप्स तयार झालेत, दै. लोकसत्ता, दै. प्रहार यांसारख्या वृत्तपत्रांनी ब्लॉग्जची दखल घेण्यासाठी सदरं सुरू केलीयेत. मधल्या काळात फेसबुक आणि ट्विटरमुळे असं वाटलं होतं की ब्लॉगिंग आणि त्यातही
मराठी ब्लॉगिंगचं काय होणार? पण, उलट ही माध्यमं ब्लॉगिंगला पूरकच ठरतायत. मराठी ब्लॉगिंगचं क्षितीजही विस्तारतंय. विविध विषयांना धीटपणे भिडताना मराठी ब्लॉगर्स दिसतायत. फक्त स्फुट लेखनंच नाही तर, कविता, फोटो, कथा असेही प्रकार हाताळले जातायत. अशाच मराठी ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्सचं कौतुक करतोय ‘एबीपी माझा’ ‘ब्लॉग माझा’ या मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रूपानं.

नेहमी प्रमाणे याहीवेळी आपले परिक्षक खास आहेत. ज्यात आहेत ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर. श्री. पानवलकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीत ज्या मोजक्या पत्रकारांनी न्यू मीडियाविषयी लिहायला सुरूवात केली त्यापैकी एक आहेत. म.टा.मध्ये गाजलेल्या त्यांच्या ‘नेटभेट’या सदराचं पुस्तकही लोकप्रिय झालंय. आपले दुसरे परिक्षक आहेत श्री. दिपक पवार. श्री. पवार हे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे अध्यक्ष आहेत. शासनाचा सर्व व्यवहार मराठीभाषेमध्ये ऑनलाईन व्हावा, विश्वकोष आणि अन्य शासकीय साहित्य ऑनलाईन यावं या आणि अशा अनेक मुद्यांवर त्यांची संस्था प्रयत्नशील आहे. आपल्या तिस-या परिक्षक आहेत इरावती कर्णिक. इरावती या प्रयोगशील युवा नाटककार तर आहेतच शिवाय विविध दैनिकांमधून त्यांनी केलेल्या लेखनालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय. 

तेव्हा मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरताच मर्यादित ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.

काय म्हणालात? बक्षिसांचं काय? अहो, बक्षीसं आहेतंच की! पहिल्या पाच जणांना विशेष पारितोषकं आणि उर्वरीत दहा जणांचा उत्तेजनार्थ गौरव. आता कोणती बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘एबीपी माझा’वर! 

.....तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!
स्पर्धेचं स्वरूप-
१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)
२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘एबीपी माझा’ हे बांधील नसतील. तुमच्या एन्ट्रीज
या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचं नाव, तुमच्या ब्लॉगची लिंक, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. ५. या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.
६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर २०१२.
८. स्पर्धेचा निकाल ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. तसंच, संबंधित विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
९. यानंतर ‘एबीपी माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.
१०. स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसं यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार ‘एबीपी माझा’कडे असतील.
११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारे बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.

No comments:

Post a Comment